नवी दिल्ली- ऑनलाईन फूड कंपनी झोमॅटोने स्पर्धक कंपनी उबेर इट्सचा देशातील सर्व हिस्सा विकत घेतला आहे. त्यामुळे घरपोहोच अन्न पोहोचविण्याच्या भारतीय व्यवसायातील ९.९९ टक्के हिस्सा मिळाल्याचे झोमॅटोने म्हटले आहे.
उबेर इट्स ही देशामध्ये पूर्वीप्रमाणे व्यवसाय सुरू ठेवणार असल्याचे झोमॅटोने म्हटले आहे. नुकतेच झोमॅटोमध्ये अलिबाबाशी संबधित असलेल्या अँट फायनान्शियल कंपनीने १५० दशलक्ष डॉलरची गुंतववणूक केली आहे. त्यानंतर झोमॅटोने उबेर इट्सचा भारतामधील संपूर्ण हिस्सा विकत घेतला आहे.
हेही वाचा-प्राप्तिकर कायद्यासह मनी लाँड्रिगमधील फौजदारी कलमाची तरतूद होणार रद्द
देशातील ५०० शहरांमध्ये फूड डिलिव्हरीच्या व्यवसायात आघाडीवर असल्याचा अभिमान आहे, असे झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपिंदर गोयल यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-दुधाच्या भुकटीवरील आयात शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव, अमूलने केला 'हा' आरोप
उबेर इट्स ही देशामध्ये २०१७ ला सुरू झाली आहे. या कंपनीबरोबर देशातील ४१ शहरांमध्ये असलेले २६,००० रेस्टॉरंट सूचिबद्ध आहेत. तर झोमॅटोच्या अपमध्ये सुमारे १५ लाख रेस्टॉरंट सूचिबद्ध आहेत. तर दर महिन्याला ७ कोटी झोमॅटोच्या सेवेचा लाभ घेतात. गेली काही महिने झोमॅटो आणि उबेरमध्ये व्यवसायिक चर्चा सुरू होती. झोमॅटो आणि स्विग्गीकडून कट्टर स्पर्धा होत असल्याने उबेर इट्सच्या तोट्यात वाढ झाली होती.