नवी दिल्ली - माध्यम विश्वातील मोठील बातमी आहे. झी एन्टरमेंट आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे विलिनीकरण होणार आहे. याबाबत झीच्या संचालक मंडळाने तांत्रिक मंजुरी दिली आहे. विलिनीकरणानंतर अस्तित्वात येणाऱ्या कंपनीमध्ये सोनीकडून 11,605.94 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
झी एन्टरमेंट आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्सच्या विलिनीकरणानंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या कंपनीचे सीईओ आणि व्यस्थापकीय संचालक पद हे पुनीत गोयंका यांच्याकडे येणार आहे. नवीन कंपनीमध्ये झी एन्टरमेंटकडे 47.07 टक्के हिस्सा असणार आहे. तर सोनी पिक्चर्सकडे 52.93 टक्के हिस्सा असणार आहे. विलिनीकरणानंतर येणाऱ्या कंपनीची शेअर बाजारात नोंदणी करण्यात येणार आहे.
हेही वाचा-महंत नरेंद्र गिरींचा गुदमरून मृत्यू; शवविच्छेदन अहवालात समोर
कंपनीच्या संचालक मंडळाचे सोनी ग्रुपमध्ये होणार विलिनीकरण