मुंबई- येस बँकेने डिश टीव्ही इंडियामध्ये ४४.५३ टक्के कोटींचा हिस्सा विकत घेतला आहे. यामुळे डिश टीव्ही इंडियाचा २४.१९ टक्के हिस्सा येस बँकेकडे येणार आहे.
डिश टीव्ही इंडियाने कर्जासाठी येस बँकेकडे शेअर तारण ठेवले होते. या कर्जवसुलीसाठी येस बँकेने डिश टीव्ही इंडियाचे शेअर घेतले आहेत. झी ग्रुपच्या एसेल बिझनेस इक्सेलेन्स सर्व्हिसेस, एस्सेल कॉर्पोरेट रिसोर्सेस, लाईव्हिंग एन्टरटेनमेंट एन्टरप्रायझेस, लास्ट माईल ऑनलाईन, पॅन इंडिया नेटवर्क इन्फ्रावेस्ट, आरपीडब्ल्यू प्रोजेक्ट्स, मुंबई डब्ल्यूटीआर आणि पॅन इंडिया इन्फ्राप्रोजेक्ट्सचे कर्ज थकले आहे.