महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शिओमी आणणार हिरेजडित सोन्याचा मोबाईल, किंमत ऐकून व्हाल थक्क - Manu Kumar Jain

मोबाईलची विक्री करायची की ते भेट द्यायचे, याचा निर्णय अजून कंपनीने घेतला नाही. मोबाईलचे कव्हर हे १० तोळा सोन्यापासून तयार करण्यात येणार आहे.

हिरेजडित सोन्याचा मोबाईल

By

Published : Jul 19, 2019, 6:14 PM IST

हैदराबाद- शिओमी भारतीय ग्राहकांकरिता 'रेडमी के २० प्रो या नावाने 'सोन्याचा मोबाईल तयार केला आहे. हे मोबाईल मर्यादित संख्येत म्हणजे केवळ २० असणार आहेत.

मोबाईलला असलेल्या सोन्याच्या कव्हरमध्ये (प्लेट) हिरे जडविण्यात येणार आहेत. या मोबाईलची किंमत ४. ८० लाख असेल, अशी माहिती शिओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनु कुमार जैन यांनी दिली.

मोबाईलची विक्री करायची की ते भेट द्यायचे, याचा निर्णय अजून कंपनीने घेतला नाही. मोबाईलचे कव्हर हे १० तोळा (१०० ग्रॅम) सोन्यापासून तयार करण्यात येणार आहे. ते कव्हरपासून काढता येणार नाही. सध्या अशा पद्धतीने दोन मोबाईल तयार करण्यात आल्याची माहिती जैन यांनी दिली. या मोबाईलचा केवळ भारतात लिलाव करण्यात येणार आहे.

टी-शर्ट, शूज आणि फिटनेस ब्रँड तयार करण्यासाठी शिओमी देशातील उत्पादकांशी चर्चा करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details