नवी दिल्ली -चिनी कंपन्यांचे आक्रमक मार्केटिंग धोरण हे नवे नाही. यामध्ये शिओमी स्मार्टफोन कंपनीने पुढचे पाऊल टाकले आहे. ही कंपनी लवकरच देशातील मोठ्या शहरात व्हेडिंग मशिनमधून स्मार्टफोन व त्याच्या अॅसेसरीज विक्रीसाठी ठेवणार आहे.
विक्रीचा असाही फंडा ; व्हेडिंग मशिनमधून शिओमी विकणार स्मार्टफोन - Xiaomi sale
व्हेडिंग मशीन विशेषत: स्मार्टफोनच्या विक्रीसाठी आणि अॅसेसरीज तयार करण्यात आले आहेत. यामध्ये २०० स्मार्टफोन ठेवण्याची क्षमता असल्याची माहिती शिओमी इंडियाने दिली
![विक्रीचा असाही फंडा ; व्हेडिंग मशिनमधून शिओमी विकणार स्मार्टफोन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3269071-658-3269071-1557757393928.jpg)
शिओमी ही भारतीय स्मार्टफोनच्या बाजारपेठेतील वरचे स्थान कायम ठेवण्यासाठी धडपडत आहे. त्यातून कंपनीने एमआ एक्प्रेस किओस्क या व्हेडिंगची संकल्पना अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या मशिनमधून ग्राहकांना क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या मदतीने स्मार्टफोन व अॅसेसरीजची खरेदी करता येणे शक्य होणार आहे.
हे व्हेडिंग मशीन विशेषत: स्मार्टफोनच्या विक्रीसाठी आणि अॅसेसरीज तयार करण्यात आले आहेत. यामध्ये २०० स्मार्टफोन ठेवण्याची क्षमता असल्याची माहिती शिओमी इंडियाने वृत्तसंस्थेला दिली. व्हेडिंग मशिन कमी खर्चात ई-कॉमर्सचा व्यवसाय क्षमतेने करण्यासाठी उपयुक्त असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ही मशिन भारतातच विकसित करण्यातच आली असून त्यासाठीचे संशोधनही देशातच करण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले. हे व्हेडिंग मशीन महानगरांमधील मेट्रो स्टेशन, एअरपोर्ट आणि शॉपिंग मॉलमध्ये बसविण्यात येणार असल्याची कंपनीने माहिती दिली. शिओमीने देशात १० हजार किरकोळ दुकाने सुरू करण्याचे एप्रिलमध्ये जाहीर केले होते.