महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 31, 2020, 12:12 PM IST

ETV Bharat / business

विप्रोच्या शेअरला २ टक्क्यांहून अधिक फटका, नीमूचवाला यांच्या राजीनाम्याचा परिणाम

मुंबई शेअर बाजारात विप्रोचे शेअर हे २.२८ टक्क्यांपर्यंत घसरून प्रति शेअर हे २३५.३० रुपये झाले आहेत. तर निफ्टीतही विप्रोच्या शेअरमध्ये २.२८ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे.

Wipro company
विप्रो कंपनी

नवी दिल्ली - आयटी कंपनी विप्रोचे शेअर आज २ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक अबिदाली झेडय नीमूचवाला यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर घसरले आहेत.

मुंबई शेअर बाजारात विप्रोचे शेअर हे २.२८ टक्क्यांपर्यंत घसरून प्रति शेअर हे २३५.३० रुपये झाले आहेत. तर निफ्टीतही विप्रोच्या शेअरमध्ये २.२८ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे.

हेही वाचा-आर्थिक सर्व्हे सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात तेजी, २०० अंशाने वधारला निर्देशांक

निफ्टीमध्ये विप्रोचे शेअर हे २३५.२० रुपये झाले आहे. विप्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीमूचवाला यांनी कौटुंबिक कारणांनी राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले.

हेही वाचा-बँक कर्मचाऱ्यांचा संप; रखडले एकूण २३ हजार कोटी रुपयांचे धनादेश

विप्रोच्या संचालक मंडळाकडून नीमुचवाला यांच्याजागी नियुक्ती करण्यासाठी अधिकाऱ्याचा शोध सुरू आहे. त्यासाठी किती वेळ लागू शकेल, हे कंपनीने स्पष्ट केले नाही. कंपनीची सेवा करणे हा माझ्यासाठी सन्मान आणि आदराची गोष्ट राहिल्याचे अबिद अली नीमुचवाला यांनी सांगितले.

दरम्यान, सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजार निर्देशांक १६८.९१ अंशाने वधारून ४१,०८२.८२ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ३९.२५ अंशाने वधारून १२,०७५.१५ वर पोहोचला.

ABOUT THE AUTHOR

...view details