महाराष्ट्र

maharashtra

टीसीएसपाठोपाठ विप्रोचे संचालक मंडळ बायबॅक शेअर घेण्यावर करणार विचार

By

Published : Oct 7, 2020, 8:02 PM IST

टीसीएसने बायबॅक शेअर घेण्यावर विचार सुरू असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर कंपनीच्या शेअर आणि भांडवली मूल्यात कमालीची वाढ झाली होती. टीसीएसच्या पावलावर पाऊल टाकत विप्रोही बायबॅक शेअर घेण्यावर विचार करणार आहे.

संग्रहित
संग्रहित

नवी दिल्ली - आयटी क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची बातमी आहे. आयटी सर्व्हिसेस कंपनी विप्रोने बायबॅक शेअर घेण्यावर संचालक मंडळ निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

विप्रोची स्पर्धक कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या संचालक मंडळाने १६ हजार कोटींचे बायबॅक शेअर घेण्याला मंगळवारी मंजुरी दिली आहे. त्यानंतर विप्रोने बायबॅक शेअरबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. कंपनीने मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले, की विप्रो कंपनीचे संचालक मंडळ बायबॅक शेअर घेण्याबाबत १३ ऑक्टोबरच्या बैठकीत विचार करणार आहे. या व्यतिरिक्त कंपनीने शेअर बाजाराला माहिती दिलेली नाही.

विप्रोच्या संचालक मंडळाने बायबॅक शेअरबाबत निर्णय घेतल्यास त्याची माहिती शेअर बाजाराला देण्यात येणार आहे. कंपनीकडून लवकरच दुसऱ्या तिमाहीच्या आर्थिक कामगिरीची आकडेवारी जाहीर करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details