नवी दिल्ली- जागतिक आरोग्य संघटनेने अखेर कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. कोव्हॅक्सिन ही भारत बायोटक या कंपनीने तयार केलेली पहिली स्वदेशी कोरोना लस आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचा तांत्रिक सल्लागार ग्रुप (TAG) आहे. या सल्लागार ग्रुपने कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी शिफारस केली आहे. सध्या, जागतिक आरोग्य संघटनेकडून कोव्हिक्सिनच्या वैद्यकीय चाचण्यांची आकडेवारीची माहिती घेतली जात आहे. टॅगने 26 ऑक्टोबरला भारत बायोटेककडून कोव्हॅक्सिनची अतिरिक्त माहिती मागविली होती.
हेही वाचा-कोव्हॅक्सिन कोरोनावर ७७.८ टक्के प्रभावी; तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष
कोव्हॅक्सिनने संपूर्ण डाटा, सुरक्षितता, कार्यक्षमता आणि उत्पादनाची गुणवत्ता याची माहिती दिली आहे. यापूर्वीच भारत बायोटेकने डाटा दिला आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन परवानगीबाबत 4 ते 6 आठवड्यांमध्ये निर्णय होईल, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी जुलैमध्ये सांगितले होते. सध्याच्या घडीला जागतिक आरोग्य संघटनेने फायझर, अॅस्ट्राझेनेका सीरम, अॅस्ट्राझेनेका ईयू, जानसी, मॉर्डना आणि सिनोफार्म या लशींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी केले ट्विट-