नवी दिल्ली- चारचाकीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी काहीशी निराशाजनक बातमी आहे. फोक्सवॅगन इंडियाचे मॉडेल पोलो आणि व्हेंटोच्या किमती १ जानेवारीपासून वाढणार आहेत. या किमती २.५ टक्क्यांनी वाढणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
उत्पादनाचा खर्च वाढल्याने फोक्सवॅगनच्या किमती वाढविण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. फोक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाचे प्रवक्ते म्हणाले की, जानेवारी २०२१ पासून फोक्सवॅगन इंडियाने वाहनाच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच मारुती सुझुकीसह इतर कंपन्यांनीही वाहनांच्या किमती जानेवारी २०२१ पासून वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाच्या वाहनांच्या किमती २ टक्क्यापर्यंत वाढणार आहेत. बीएमडब्ल्यू आणि सर्व मिनी मॉडेलचे दर हे ३ जानेवारी २०२१ पासून वाढणार आहेत. निस्सान वाहनांच्या किमती ५ टक्क्यापर्यंत वाढणार आहेत.