नवी दिल्ली- व्होडाफोन इंडिया दर महिन्याला लाखो ग्राहक गमवित आहे. अशा स्थितीत कंपनी कोणत्याही दिवशी गाशा गुंडळाणार असल्याची दूरसंचार क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे.
व्होडाफोन आयडिया कंपनीचे भांडवली मूल्य घसरत असल्याने नवा निधी मिळविण्यातही कंपनीपुढे अडचणी निर्माण होत आहेत. व्होडाफोन इंडिया देशातील व्यवसाय बंद करणार असल्याचे वृत्त हे चुकीचे आणि निराधार असल्याचे कंपनीने म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच केंद्रीय दूरसंचार विभागाच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे व्होडाफोन इंडियाला येत्या तीन महिन्यात दूरसंचार विभागाला २८ हजार ३०९ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.