मुंबई - व्होडाफोन आयडियाचे शेअर आज ३४ टक्क्यांनी घसरले आहेत. दूरसंचार कंपन्यांनी एजीआरवरील निकालावर पुनर्विचार करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल केली होती. ही याचिका गुरुवारील फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे व्होडाफोन आयडियाच्या शेअरला फटका बसला आहे.
सर्वोच्च न्यायलयाने याचिका फेटाळल्याने दूरसंचार कंपन्यांना सुमारे १.४७ लाख कोटी रुपये २३ जानेवारीपर्यंत भरावे लागणार आहेत. मुंबई शेअर बाजारात व्होडाफोन आयडियाचे शेअर ३४ टक्के घसरून प्रति शेअर ३ रुपये झाले आहेत. मुंबई शेअर बाजारात भारती एअरटेलचे सुरुवातीला ०.८३ टक्क्यांनी शेअर घसरले. त्यानंतर सावरून पुन्हा वधारले आहेत.
हेही वाचा-सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे थकित रक्कम भरा; सरकारची दूरसंचार कंपन्यांना नोटीस
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने कंपन्यांच्या आर्थिक ताळेबंदावर तणाव येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर ठेवत आम्हाला निराशा व्यक्त करावी लागेल, असे एअरटेलने म्हटले आहे. दीर्घकाळ वाद चालू राहिल्याने सध्याची एजीआरची व्याख्या तयार झाल्याचेही एअरटेलने म्हटले आहे.