नवी दिल्ली - आर्थिक तोट्यात असलेल्या व्होडाफोन आयडियाने एजीआर शुल्कापोटी ३,३५४ कोटी रुपयांची आगाऊ रक्कम सरकारला दिली आहे. कंपनीला द्यावे लागणाऱ्या एजीआरचे स्वमूल्यांकन करून ही रक्कम देण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.
व्होडाफोन आयडियाने दूरसंचार विभागाला एकूण ६,८५४ कोटी रुपये एजीआर शुल्कापोटी दिले आहेत. दूरसंचार विभागाला द्यावी लागणारी सर्व मुद्दल रक्कम आजपर्यंत भरल्याचे व्होडाफोन आयडियाने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
हेही वाचा- ..तर तुमचे डेबिटसह क्रेडिट कार्ड बंद होणार
दूरसंचार विभागाच्या आकडेवारीनुसार व्होडाफोन आयडियाला एजीआर शुल्कापोटी ५३ हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. यामध्ये व्याज, दंड आणि उशीराच्या कालावधीवरील व्याज याचा समावेश आहे. यापूर्वी व्होडाफोन आयडियाने १७ फेब्रुवारी २०२० ला २,५०० कोटी रुपये दूरसंचार विभागाकडे जमा केले आहेत. तर २० फेब्रुवारीला व्होडाफोन आयडियाने १ हजार कोटी रुपये दूरसंचार विभागाला दिले आहेत.
हेही वाचा-कोरोनाने अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम टाळण्यासाठी आरबीआयकडे सर्व पर्याय तयार