महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

एजीआरच्या निकालानंतर व्होडाफोन आयडिया रोखे आणण्याच्या प्रस्तावावर करणार विचार - Latest vodafone Idea news

सर्वोच्च न्यायालयाने थकित एजीआर शुल्क भरण्यासाटी दूरसंचार कंपन्यांना १० वर्षांची मुदत दिली आहे. त्यापैकी एकूण थकित एजीआर शुल्कापैकी १० टक्के शुल्क हे ३१ मार्च २०२१ पर्यंत दूरसंचार कंपन्यांना भरणे बंधनकारक आहे.

व्होडाफोन आयडिया
व्होडाफोन आयडिया

By

Published : Sep 2, 2020, 3:58 PM IST

Updated : Sep 2, 2020, 4:30 PM IST

नवी दिल्ली- व्होडाफोन आयडियाच्या संचालक मंडळाची शुक्रवारी बैठक होणार आहे. या बैठकीत सार्वजनिक रोख्यांमधून एक अथवा अधिक टप्प्यांतून निधी जमविण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच इक्विटी शेअर अथवा रोख्यांच्या प्रस्तावांचे मूल्यांकन संचालक मंडळाकडून करण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने थकित एजीआर शुल्क भरण्यासाटी दूरसंचार कंपन्यांना १० वर्षांची मुदत दिली आहे. त्यापैकी एकूण थकित एजीआर शुल्कापैकी १० टक्के शुल्क हे ३१ मार्च २०२१ पर्यंत दूरसंचार कंपन्यांना भरणे बंधनकारक आहे. हे शुल्क भरण्यासाठी व्होडाफोनकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

संबंधित बातमी वाचा-एजीआरच्या निकालानंतर व्होडाफोनच्या शेअरमध्ये १३ टक्क्यांची घसरण

व्होडाफोन आयडियाच्या संचालक मंडळाची ४ सप्टेंबर २०२० ला बैठक होणार असल्याची माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे. दूरसंचार विभागाच्या मूल्यांकनानुसार व्होडाफोनकडे एजीआरपोटी ५८ हजार २५४ कोटी रुपये थकित आहेत. तर सरकारच्या आकडेवारीप्रमाण व्होडाफोनकडे एजीआरचे ५० हजार ३९९ कोटी रुपये थकित आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने एजीआरवरील निकाल दिल्यानंतर व्होडाफोनचे शेअर मंगळवारी घसरले होते. यापूर्वी कंपनीने थकित एजीआर शुल्क भरण्यासाठी केंद्र सरकारकडे २० वर्षांचा अवधी मागितला होता.

संबंधित बातमी वाचा-दूरसंचार कंपन्यांना 'सर्वोच्च' दिलासा; थकित एजीआर शुल्क भरण्याकरता १० वर्षांची मुदत

Last Updated : Sep 2, 2020, 4:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details