महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

व्होडाफोन आयडियाचे बदलले नाव; 'वूई' ब्रँडची घोषणा

नव्या ब्रँडच्या लाँचिंगमध्ये बोलताना कंपनीचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक रविंदर टक्कर म्हणाले, की दोन्ही कंपन्या दोन वर्षांपूर्वी एकत्रित आल्या होत्या. तेव्हापासून आम्ही मोठे नेटवर्क, आमचे लोक आणि प्रक्रियेला एकत्रित आणण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.

वूई
वूई

By

Published : Sep 7, 2020, 2:04 PM IST

मुंबई - दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडिया लि. या कंपनीने ब्रँडचे आज नाव बदलले आहे. व्होडाफोन आणि आयडिया या दोन्ही कंपन्यांनी एकत्रितपणे 'व्हीआय' (वूई) या ब्रँडची ऑनलाइन आज घोषणा केली आहे.

नव्या ब्रँडच्या लाँचिंगमध्ये बोलताना कंपनीचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक रविंदर टक्कर म्हणाले, की दोन्ही कंपन्या दोन वर्षांपूर्वी एकत्रित आल्या होत्या. तेव्हापासून आम्ही मोठे नेटवर्क, आमचे लोक आणि प्रक्रियेला एकत्रित आणण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आज आम्हाला 'वूई' सादर करताना आनंद होत आहे. हा ब्रँड लोकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण अर्थ आणेल, असे टक्कर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-'भारताच्या जीडीपीतील घसरण ही प्रत्येकासाठी धोक्याची घंटा'

टक्कर म्हणाले, की भारतीय लोक आशावादी आहेत. त्यांना आयुष्यात पुढे जायचे आहे. या प्रवासात त्यांना विश्वासू भागीदार आवडणार आहे. व्हीआय ग्राहकांच्या गरजेप्रमाणे मदत करण्यासाठी लक्ष केंद्रित करणार आहे. या दोन ब्रँडच्या एकत्रितकरणातून केवळ दोन मोठ्या दूरसंचार कंपन्यांचे एकत्रित होणार नाही. तर आमचा भविष्याचा प्रवासही निश्चित होणार आहे. यामध्ये १०० कोटी भारतीयांना जागतिक दर्जाचा डिजिटल अनुभव आणि ४जी नेटवर्क बळकट करणे यांचा समावेश आहे.

हेही वाचा-जिओपाठोपाठ एअरटेलचा अमर्यादित ब्रॉडबँड प्लॅन जाहीर; 'या' मिळणार सुविधा

दरम्यान, व्होडाफोन आयडियाकडे सुमारे ५० हजार कोटी एजीआरचे थकित आहेत. अशा परिस्थितीत कंपनीने २५ हजार कोटींचे भांडवल उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details