नवी दिल्ली - व्होडाफोन आयडियाने केंद्र सरकारला थकीत एजीआर प्रकरणातील आणखी 1 हजार कोटी रुपये दिले आहेत. यानंतर व्होडाफोनने केंद्र सरकारला दिलेली एकूण रक्कम ही 7 हजार 454 कोटी रुपये झाली आहे.
व्होडाफोनकडून सरकारकडे थकित एजीआरचे 1 हजार कोटी जमा
व्होडाफोन आयडियाने यापूर्वी केंद्र सरकारला तीन टप्प्यात 6 हजार 854 कोटी रुपये दिले आहेत.
व्होडाफोन आयडियाने यापूर्वी केंद्र सरकारला तीन टप्प्यात 6 हजार 854 कोटी रुपये दिले आहेत. व्होडाफोन आयडियाने केंद्रीय दूरसंचार विभागाला 17 जुलै रोजी 1000 कोटी रुपये दिले आहेत. व्होडाफोनसह सर्व दूरसंचार कंपन्यांनी योग्य थकित रक्कम दूरसंचार विभागाला द्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीत आदेश दिले होते.
केंद्रीय दूरसंचार विभागाच्या आकडेवारीनुसार व्होडाफोन आयडियाकडे 58 हजार कोटी रुपये थकीत आहेत. गतवर्षी सर्वोच्च न्यायालयाने सर्व दूरसंचार कंपन्यांना थकीत एजीआरचे पैसे देण्याचे आदेश दिले होते.