नवी दिल्ली - टाटाची कंपनी नेल्को आणि व्हीसॅट सोल्युशन्शने विमानांमध्ये वायफायची सुविधा मिळू शकणारी सेवा (आयएफसी) लाँच केली आहे. ही सेवा विस्तारा विमान कंपनीकडून प्रवाशांना देण्यात येणार आहे.
विमानामध्ये वायफायची सेवा देणारी नेल्को ही पहिली भारतीय कंपनी आहे. विस्ताराने या सेवेसाठी कंपनीबरोबर करार केला आहे. विस्तारा ही विमानामध्ये वायफाय देणारी पहिली भारतीय विमान कंपनी ठरणार आहे.
हेही वाचा-मद्यावरील आयात शुल्कात कपात करू नये- उद्योगाची सरकारला विनंती
कंपनीने पॅनासॉनिक एव्हिॉनिक्स कॉर्पोरेशनबरोबर चांगली सेवा देण्यासाठी भागीदारी केलेली आहे. देशातील विमान कंपन्यांना ब्रॉडबँड इंटरनेटची सेवा विमान प्रवाशांना मिळू शकणार आहे. एअरो आयएफसी सेवेमध्ये घर आणि कार्यालयाप्रमाणेच आकाशामधून जाणाऱ्या विमानात वायफाची सुविधा मिळते. केंद्र सरकारने डिसेंबर २०१८ मध्ये विमान आणि जहाजांसाठी आयएफएमसी परवाने देण्याची घोषणा केली. यामधून आकाशातून जाणारे विमान पाण्यामधून जाणाऱ्या बोटींसाठी इंटरनेट देण्याची परवानगी कंपन्यांना मिळू शकते. आयएफएमसी परवाना हा दूरसंचार मंत्रालयाकडून देण्यात येतो.
हेही वाचा-शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना ऐच्छिक; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी