नवी दिल्ली – विस्तारा कंपनी प्रवाशांना खास ऑफर देणार आहे. विमान प्रवाशांनी इकॉनॉमी क्लासचे तिकीट बुकिंग केल्यानंतर त्याहून वरिष्ठ श्रेणीतील आसनावरून त्यांना प्रवास करता येणार आहे. ही सेवा देण्यासाठी विस्तारानेकॅनडाच्या कंपनीबरोबर करार केला आहे.
इकोनॉमी क्लासच्या तिकीट खरेदीवर विस्ताराच्या प्रवाशांना मिळणार बिझनेस क्लासचे तिकीट - Vinod Kannan on Vistara new service
उच्च श्रेणीतील आसनासाठी विमान निघण्याच्या दिवसापूर्वी सात दिवस अगोदर प्रवाशांना ऑफरची मागणी करावी लागणार आहे. जर त्यांची ऑफर मान्य झाली तर त्यांना विमान निघण्यापूर्वी कळविण्यात येणार आहे.
चालू आर्थिक वर्षात उत्पन्नाचे नुकसान कमी करण्यासाठी योजना सुरू केल्याचे विस्तारा कंपनीने म्हटले आहे. अनेक प्रवासी इकोनॉमी अथवा प्रिमियम इकॉनॉमी श्रेणीतील तिकीट खरेदी करतात. उच्च श्रेणीतील आसनासाठी विमान निघण्याच्या दिवसापूर्वी सात दिवस अगोदर प्रवाशांना ऑफरची मागणी करावी लागणार आहे. जर त्यांची ऑफर मान्य झाली तर त्यांना विमान निघण्यापूर्वी कळविण्यात येणार आहे. प्लसग्रेडमधून प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार असल्याचे विस्ताराचे मुख्य वाणिज्य अधिकारी विनोद कान्नन यांनी सांगितले.
प्लसग्रेड ही कंपनी जगभरातील प्रवास उद्योगाला उत्पन्न वाढविण्यासाठी सुविधा देते. विस्ताराकडे 43 विमाने आहेत. त्यामधील बहुतांश विमानांमध्ये इकॉनॉमी, प्रिमिअम इकॉनॉमी आणि बिझनेस अशी तीन श्रेणीतील आसने आहेत. कोरोना महामारीमुळे विमान कंपन्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे विमान कंपन्यांकडून उत्पन्न वाढविण्यासाठी विविध सवलतीच्या योजना जाहीर करण्यात येत आहेत.