नवी दिल्ली - दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाच्या संचालक मंडळाने २५ हजार कोटी रुपयांचे भांडवल उभे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हा निधी शेअर आणि कर्जरोखे या दोन्हींच्या माध्यमांतून उभारण्यात येणार आहे.
उभारण्यात येणाऱ्या निधीचे एकूण प्रमाण हे २५ हजार कोटी रुपयांहून अधिक नसेल, असे व्होडाफोन आयडियाने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. सुरक्षित आणि असुरक्षित अशा कर्जरोख्यांच्या माध्यमातून १५ हजार कोटी रुपये उभारण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक अथवा खासगी माध्यमातून गुंतवणूक स्वीकारण्यात येणार आहे. ही गुंतवणूक एक किंवा अधिक टप्प्यात असेल. निधी उभारण्याची ही योजना गुंतवणूकदार आणि इतर नियामक संस्थांच्या मंजुरीवर अवलंबून असेल, असे व्होडाफोन आयडियाने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे.
हेही वाचा-खासगीकरणानंतरही भारत पेट्रोलियमचे घरगुती सिलिंडर खरेदी करणाऱ्यांना मिळणार अनुदान