बंगळुरू- ओला कंपनीच्या सेवेवर बंदी घालण्यात आल्याने केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी कर्नाटक सरकावर टीका केली आहे. ओलावरील बंदी हटवावी, अशी त्यांनी कर्नाटक सरकारला विनंती केली आहे.
कर्नाटक सरकारने ओला कॅबच्या सेवेवर ६ महिन्यांसाठी बंदी घातली आहे. त्यामुळे चालक आणि त्यांचे कुटुंबीय अडचणींना सामोरे जात आहे. जर ओला कंपनीकडून काही चुकीचे झाले असल्याचे सीईओवर कारवाई करावी, दंड ठोठवावा, असे सदानंद गौडा म्हणाले. मात्र, संपूर्ण ओला कॅबवर बंदी आणणे चूकीचे असल्याची त्यांनी भूमिका मांडली आहे. कॅब चालकांनी कारसाठी बँकांकडून कर्ज घेतले आहे. त्यासाठीचा मासिक हप्ताही भरणे चालकांना शक्य होत नाही. तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे त्यांना अवघड झाल्याकडे गौडा यांनी लक्ष वेधले.