नवी दिल्ली- ऑनलाईन फूड सेवा देणाऱ्या कंपन्यामध्ये तीव्र स्पर्धा निर्माण होत आहे. भारतात २०१७ मध्ये सेवा सुरू केलेल्या उबेर इट्सने शहरातील तरुण व्यावसायिकांवर लक्ष केंद्रीत केले. तसेच छोट्या शहरातील एकत्र कुटुंबाकडे व्यवसायासाठी प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
उबेर इट्स ऑनलाईन फूड सेवेकरिता छोट्या शहरांकडे वळणार - online food service
जपानमध्ये वयोवृद्धांचे अधिक प्रमाण असलेल्या लोकसंख्येमुळे उबेरला यश मिळाले आहे. मात्र भारतात वय आणि प्रादेशिक विभाग यांच्यापलीकडे उबेरचा विस्तार होत असल्याचा उबेर इट्सचे (आशिया पॅसिफिक) प्रमुख राज बेरी यांनी दावा केला.
उबेरमधून संमिश्र पद्धतीच्या ऑर्डर मागविल्या जात आहेत. केवळ शुक्रवारी रात्री अथवा सणाला नाही तर नियमितपणे ग्राहकांकडून मागणी आहे. ही माहिती उबेर इट्सचे (आशिया पॅसिफिक) प्रमुख राज बेरी यांनी दिली. जपानमध्ये वयोवृद्धांचे अधिक प्रमाण असलेल्या लोकसंख्येमुळे उबेरला यश मिळाले आहे. मात्र भारतात वयोगट आणि प्रादेशिक विभाग यांच्यापलीकडे उबेरचा विस्तार होत असल्याचा बेरी यांनी दावा केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतामधील व्यवसायात ५० टक्क्यांची वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
उबेर इट्सचे जागतिक प्रमुख जॅसोन ड्रोज यांच्या माहितीनुसार ऑनलाईन फूडची भारत ही जगातील वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे. सध्या उबेरची सेवा ३८ शहरामध्ये सुरू आहे. त्यापूर्वीच स्विग्गी, झॉमेटो आणि फूडपांडा या कंपन्यांच्या सेवा रुळलेल्या आहेत. त्यामुळे उबेरला त्यांच्याबरोबर तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. उबेर इट्सचे वरिष्ठ संचालक स्टिफन चाऊ म्हणाले, आम्ही कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेचा आणि मशिन लर्निंगचा उपयोग करत आहोत. वापरकर्त्यांना केवळ माहिती कळावी आणि पारदर्शकतेचा फायदा व्हावा, हा त्यामागे हेतू आहे.