महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 29, 2021, 4:38 PM IST

ETV Bharat / business

ट्विटरकडून ब्ल्यू बॅजची पडताळणी बंद; पुन्हा प्रक्रिया करणार सुरू

सध्या मिळालेल्या पडताळणी अर्जांचे अवलोकन केल्यानंतर पुन्हा लवकरच ब्ल्यू बॅज सुरू होणार असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. यापूर्वी ट्विटरने २०१७ मध्ये ब्ल्यू बॅजची पडताळणी बंद केली होती.

ट्विटर
ट्विटर

नवी दिल्ली- ट्विटरने ब्ल्यू बॅजचा पडताळणी कार्यक्रम काही दिवसांसाठी बंद केला आहे. ब्ल्यू बॅजला लाँचिंगनंतर आठवडाभरात प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे ट्विटरने म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात ट्विटरने ब्ल्यू बॅजच्या पडताळणीचा कार्यक्रम पुन्हा सुरू केला होता. त्यामध्ये सहा क्षेत्रातील वापरकर्त्यांना ब्ल्यू बॅजसाठी पडताळणी अर्ज दिला होता. त्यासाठी वापरकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सध्या मिळालेल्या पडताळणी अर्जांचे अवलोकन केल्यानंतर पुन्हा लवकरच ब्ल्यू बॅज सुरू होणार असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. यापूर्वी ट्विटरने २०१७ मध्ये ब्ल्यू बॅजची पडताळणी बंद केली होती.

हेही वाचा-बनावट रेमडेसिवीर इंजेक्शनला आळा घालण्याकरिता झायडसकडून 'स्क्रॅचकोड'


ट्विटरने सुरू केले 'या' सहा क्षेत्रांतील व्यक्तींकरिता ब्ल्यू स्टिक व्हेरिफेकिशन
कंपनी, सरकार, ब्रँड आणि संस्था, नवीन संस्था आणि पत्रकार, माध्यम, स्पोर्ट्स आणि गेमिंग, चळवळींमधील कार्यकर्ते, संस्था आणि वैयक्तिक प्रभावी असलेल्या व्यक्तींसाठी ब्ल्यू स्टिक मिळणार आहेत. त्यानंतर काही वर्गवारीसाठी ब्ल्यू स्टिक दिल्या जाणार आहेत. यामध्ये वैज्ञानिक, धार्मिक नेते व तज्ज्ञ यांचा समावेश आहे. येत्या काही आठवड्यात प्रत्येकाला नवीन व्हेरिफेकेशनचा पर्याय अकाउंट सेटिंग टॅबमध्ये मिळणार आहे.


हेही वाचा-भारतीय कर्मचारी घरातून काम करताना दर आठवड्याला ५ तास वाया घालवितात

अशी होती प्रक्रिया

  • प्रत्येकाच्या अप्लिकेशनचे वेळेवर पुनरावलोकन करण्याची आम्ही खात्री देण्याचा प्रयत्न करत आहोत, असे ट्विटरने ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे.
  • अप्लिकेशन केल्यानंतर काही आठवड्यात ई-मेलवर प्रतिसाद दिला जाणार आहे. मात्र, त्यासाठी काही आठवडे लागण्याची शक्यता आहे.
  • जर अप्लिकेशन मंजूर झाले तर आपोआप ब्ल्यू बॅज हा प्रोफाईलला दिसणार आहे.
  • जर अप्लिकेशनमध्ये काही चूक झाली असेल तर ३० दिवसानंतर अप्लिकेशन करता येणार असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.
  • गेल्या काही आठवड्यांपासून ट्विटरकडून ब्ल्यू बॅजच्या पात्रतेत पारदर्शकता आणण्यासाठी काम सुरू आहे. त्यासाठी कंपनीने लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन नवे धोरण जाहीर केले आहे. या नव्या धोरणानुसार माहिती अपडेट नसेल तर पूर्वीच्या प्रोफाईल पेजवरील ब्ल्यू बॅजेसही काढण्यात येणार आहेत.
  • नव्या अटीनुसार तुमचे अकाउंट पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यामध्ये तुमचे प्रोफाईल नाव, प्रोफाईल इमेज आणि अधिकृत फोन आणि ई-मेल असणे आवश्यक आहे.
  • तसेच ब्ल्यू बॅजला अप्लिकेशन करण्यापूर्वी सहा महिने खाते सक्रिय असणे आवश्यक आहे.
  • त्या कालावधीमध्ये ट्विटरच्या नियमांचे पालन केलेले असावे.

ABOUT THE AUTHOR

...view details