नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटातही टीव्हीएस मोटर कंपनीने मोठी व्यवसायिक झेप घेतली आहे. टीव्हीएसने इंग्लंडमधील नॉर्टॉन मोटरसायकल कंपनी सुमारे १५३ कोटी रुपयांना विकत घेतली आहे.
नॉर्टॉन कंपनी स्थापना जेम्स लॅन्सडाऊन नॉर्टन यांनी १९१८ मध्ये केली होती. ही कंपनी इंग्लडंमध्ये लोकप्रिय आहे. नॉर्टॉन मोटरसायकलचे मॉडेल हे क्लासिक आणि आलिशान श्रेणीत उपलब्ध आहेत. तर कंपनीची कंमाडो आणि १२००सीसी व्ही ४ सुपरबाईकदेखील ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे.