नवी दिल्ली - टीव्हीएस मोटर कंपनीने देशातील पहिली इथेनॉलवर चालणारी दुचाकी लाँच केली आहे. केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसह पर्यावरणस्नेही इंधनाचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही दुचाकी हरित आणि शाश्वत मोबिलीटीसाठी चांगला पर्याय ठरू शकणार आहे.
देशातील पहिली इथेनॉलवर चालणारी दुचाकी टीव्हीएसकडून लाँच - Niti Ayog
दुचाकीच्या लाँचिंगवेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री निती गडकरी, नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत उपस्थित होते.
दुचाकीच्या लाँचिंगवेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री निती गडकरी, नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत उपस्थित होते. कंपनीने इथेनॉलवर चालणाऱ्या दुचाकीची संकल्पना टीव्हीएस अॅपाचे आरटीआर २०० मधून ऑटो प्रदर्शनात २०१८ मध्ये दिली होती. टीव्हीएस अॅपाचे हा टीव्हीएस मोटर कंपनीचा फ्लॅगशीप ब्रँड आहे. या दुचाकीचे जगभरात ३. ५ कोटी ग्राहक आहेत. दुचाकी वाहन उद्योगाला हरित आणि शाश्वत मोबिलिटीच्या सुविधा द्यायच्या आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रिक वाहने, हायब्रीड आणि पर्यायी इंधन यांचा समावेश असल्याचे टीव्हीएसचे चेअरमन वेणू श्रीनिवासन यांनी सांगितले.
देशामध्ये साखर कारखान्यासह इतर उद्योगाकडून इथेनॉलेचे उत्पादन घेण्यात येते. ते बिनविषारी, जैविक विघटन होणारे आणि हाताळणे, वाहतूक आणि साठविण्यासाठी सुरक्षित आहे. इथेनॉलचा वाहनामध्ये वापर केल्यास पेट्रोलियम आयात कमी होईल, अशी सरकारला अपेक्षा आहे.