महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कार खरेदीनंतर तीन महिन्याने ईएम‌आय सुरू.. टोयोटाची भन्नाट ऑफर - reopening of showrooms

ग्राहकांनी कार खरेदी करावी, यासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. टाळेबंदी शिथील होत असताना शोरूम खुल्या आहेत. अशा वेळी कार विक्री वाढण्यासाठी योजना जाहीर केल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Toyota Kirloskar
टोयोटा किर्लोस्कर

By

Published : Jun 12, 2020, 7:27 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने कार खरेदीवर आकर्षक योजना जाहीर केली आहे. ग्राहकांनी कार खरेदी केल्यानंतर त्यांना 90 दिवसापर्यंत मासिक हप्ता द्यावा लागणार नाही.

ग्राहकांनी कार खरेदी करावी, यासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएएम) कंपनीने आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. टाळेबंदी शिथील होत असताना शोरूम खुल्या आहेत. अशा वेळी कार विक्री वाढण्यासाठी योजना जाहीर केल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ही स्पेशल ऑफर बीएस -6 इंजिन क्षमता असलेल्या सर्व प्रकारच्या वाहन खरेदीवर होणार आहे. कंपनी भागीदारी असलेल्या वित्तीय संस्थांबरोबर जवळून काम करत आहे. इनोवा, क्रिस्टा आदी वाहने झिरो डाऊनपेमेंटवर खरेदी करता येणार आहेत. प्रति एक लाख रुपयांवर सहा महिन्यांसाठी मासिक 899 रुपये हप्ता अशीही योजना असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ही योजना सर्व वाहनांच्या मॉडेलवर उपलब्ध आहे

यारीससह काही मॉडेलच्या खरेदीवर बाय बॅक म्हणजे रोख रक्कमेची सवलत देणार असल्याचीही कंपनीने घोषणा केली आहे. टीकेएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष( खरेदी आणि सेवा) नवीन सोनी यांनी म्हटले, सध्याच्या अनिश्चिततेच्या काळात ग्राहकांना प्रोत्साहित करण्याची आमची इच्छा आहे. त्यामधून ग्राहकांची कौटुंबिक वाहतुकीची गरज पूर्ण होऊ शकणार आहे. वित्तीय योजना ग्राहकांचे स्वप्न समजू शकतात, अशी आम्हाला आशा आहे. टोयोटा ही ग्राहकांना मानसिक शांततेचे वचन देत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, गेले वर्षभर मंदावलेल्या आर्थिक स्थितीमुळे वाहन उद्योगाला मोठा फटका बसला आहे. तर चालू वर्षात कोरोना आणि टाळेबंदीमुळे वाहन व्यवसाय‌ संकटात सापडला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details