महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

व्होडाफोन-आयडियाने सुरू केले ३जी वापरकर्त्यांचे अपग्रेडिंग - Vodafone Idea Ltd latest news

टेलिकॉम ऑपरेटर कंपन्या व्होडाफोन आणि आयडिया यांचे एकीकरण पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे कंपनीच्यावतीने आता वापरकर्त्यांचे अपग्रेडिंग करण्यास सुरुवात केली आहे.

Vodafone Idea Ltd
वोडाफोन आयडिया लिमीटेड

By

Published : Sep 27, 2020, 5:02 PM IST

नवी दिल्ली - टेलिकॉम ऑपरेटर व्होडाफोन आयडिया लिमिटेडने (व्हीआयएल) आपल्या ३जी वापरकर्त्यांचे ४जीमध्ये रुपांतर करण्यास सुरुवात केली आहे. या व्यतिरिक्त २जी वापरकर्त्यांचेही ४जीमध्ये रुपांतर केले जाणार आहे. मात्र, अशा वापरकर्त्यांच्या २जी सेवांचे फायदे कायम ठेवले जातील, अशी माहिती कंपनीच्यावतीने देण्यात आली.

वापरकर्त्यांचे रुपांतर ४जीमध्ये केले गेले, तरी २जी वापरकर्त्यांना व्हॉइस कॉलिंगसाठी आणि ३जी वापरकर्त्यांना इंटरनेटसाठी मिळाणाऱ्या सुविधा व फायदे कायम ठेवले जातील. हळूहळू त्यांचा समावेश ४जीमध्ये केला जाईल. कंपनीच्यावतीने आपल्या ग्राहकांना याबाबत संपर्क साधण्यास सुरुवात झाली आहे. आमचे प्रतिनिधी ग्राहकांना याबाबत सर्व माहिती देत आहेत, असेही व्हीआयएलने सांगितले.

आमचे दोन कंपन्यांचे एकीकरण पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. अगोदरच आम्ही आमच्या ४जी सेवेचे विस्तारिकरण केले आहे. आतापर्यंत १० कोटी भारतीयांना सेवा देत आहोत. ४जी सेवेच्या विस्तारिकरणामुळे ग्राहकांना जलद इंटरनेट सेवेचा लाभ घेता येणार आहे, असे व्हीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठक्कर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details