नवी दिल्ली- आयटी कंपनी टेक महिंद्राला पिंपरी चिंचवड महापालिकेचे ५०० कोटींचे कंत्राट मिळाले आहे. टेक महिंद्राला स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम करण्यासाठी हे कंत्राट देण्यात आले आहे.
स्मार्ट सिटीच्या अंतर्गत प्रकल्पामधून टेक महिंद्रा १५ लाख नागरिकांशी महापालिका जोडण्यात येणार आहे. त्यामधून शाश्वत व स्मार्ट शहर तयार करण्याचा उद्देश आहे. टेक महिंद्राच्या 'टेकएननेक्स्ट स्ट्रॅटजी' या नव्या पिढीतील तंत्रज्ञानाचा ग्राहकांना अनुभव घेता येणार आहे. हे तंत्रज्ञान स्मार्ट सिटी तयार करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे टेक महिंद्राचे कॉर्पोरेट अफेअर्स प्रमुख सुजित बक्षी यांनी सांगितले.