नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी टीसीएस ही १६ हजार कोटी रुपयांचे शेअरबॅक करणार आहे. ही शेअरबॅक योजना १८ डिसेंबरला सुरू होणार आहे. तर १ जानेवारी २०२१ ला संपणार आहे.
टीसीएसने मागील महिन्यात 5,33,33,333 इतके शेअर परत घेण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. सेबीच्या नियमानुसार पात्र समभागधारकांचे (शेअरहोल्डर) पत्र १५ डिसेंबर २०२० पूर्वी जाहीर केले जाणार आहे. शेअरच्या सेटलमेंटसाठी शेवटची तारीख १२ जानेवारी २०२१ आहे.
हेही वाचा-फेसबुक इंडियाच्या उत्पन्नात ४३ टक्क्यांची वाढ; नफा १३५ कोटी रुपये!
टीसीएसची स्पर्धक कंपनी विप्रोने यापूर्वी ९,५०० कोटी रुपयांचे शेअर मागे घेण्याचे जाहीर केले आहे. टीसीएसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन म्हणाले, की कंपनी ही समभागधारकांना भांडवल परत देण्याच्या निर्णयावर लक्ष केंद्रित करत आहे. मुंबईस्थित टीसीएसकडे सप्टेंबर २०२० मध्ये ५८,५०० कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये टीसीएस संचालक मंडळाने विशेष लाभांश जाहिर केला होता.