महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'टीसीएस'च्या नफ्यात तिसऱ्या तिमाहीत अंशत: वाढ

टीसीएस कंपनीचा महसूल तिसऱ्या तिमाहीदरम्यान ६.७ टक्क्यांनी वाढला आहे.

TCS
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस

By

Published : Jan 17, 2020, 5:34 PM IST

मुंबई - देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) तिसऱ्या तिमाहीत ०.२ टक्के अधिक नफा नोंदविला. टीसीएसला तिसऱ्या तिमाहीत डिसेंबर अखेर ८,११८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.


गेल्या वर्षी टीसीएसला तिसऱ्या तिमाही अखेर ८,१०५ कोटी रुपयांचा नफा झाला होता.

हेही वाचा-देशातील अ‌ॅमेझॉन प्राईममध्ये दुप्पट गुंतवणूक करणार - जेफ बेझोस

कंपनीचा महसूल तिसऱ्या तिमाहीदरम्यान ६.७ टक्क्यांनी वाढला आहे. चालू वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत महसूल ३९,८५४ कोटी रुपये मिळवला आहे. तर, गतवर्षी तिसऱ्या तिमाहीत ३७,३३८ कोटी रुपये महसूल मिळविला होता.

हेही वाचा-पियूष गोयल यांच्या वक्तव्यानंतर अ‌ॅमेझॉनने 'ही' केली घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details