महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 26, 2020, 9:31 PM IST

ETV Bharat / business

टीसीएसचे संस्थापक एफ. सी. कोहली यांचे ९६ व्या वर्षी निधन

सॉफ्टवेअर उद्योगातील योगदानाबद्दल फकीरचंद कोहली यांना भारत सरकारने २००२ मध्ये पद्मभुषण पुरस्काराने सन्मानित केले होते. ते देशातील सॉफ्टवेअरचे तंत्रज्ञान आणि क्रांतीत आघाडीवर होते.

एफ. सी. कोहली
एफ. सी. कोहली

नवी दिल्ली - भारतीय सॉफ्टवेअर उद्योगाचे पिता आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे पहिले सीईओ फकीरचंद कोहली यांनी आज अखरेची श्वास घेतला. ते मृत्यूसमयी ९६ वर्षांचे होते. या वृत्ताला टीसीएसने पुष्टी दिली आहे.

सॉफ्टवेअर उद्योगातील योगदानाबद्दल फकीरचंद कोहली यांना भारत सरकारने २००२ मध्ये पद्मभुषण पुरस्काराने सन्मानित केले होते. ते देशातील सॉफ्टवेअरचे तंत्रज्ञान आणि क्रांतीत आघाडीवर होते. सध्याची १०० अब्ज डॉलरचा सॉफ्टवेअर उद्योग विकसित करण्यासाठी त्यांनी मोलाची मदत केली आहे. त्यांचा पेशावरमध्ये १९ मे १९२४ मध्ये जन्म झाला होता. त्यांनी विदेशात एमआयटीमधून १९५० ला मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये एम. एसचे शिक्षण घेतले.

हेही वाचा-धक्कादायक! बँकांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या 27 फरार आर्थिक गुन्हेगारांपैकी फक्त दोघांवर कारवाई

प्रथम टाटा इलेक्ट्रिक कंपनीत जबाबदारी-

कोहली यांनी टाटा इलेक्ट्रिक कंपनीत संचालक म्हणून १९७० वर्षी जबाबदारी स्वीकारली. डिजीटल कॉम्प्युटरचा पॉवर सिस्टिमध्ये डिझाईन आणि नियंत्रण करण्याची त्यांच्यावर जबाबदारी होती. कोहली यांची १९६९ मध्ये टीसीएसचे मुख्य व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर तर १९९४ मध्ये कंपनीच्या डेप्युटी चेअरमनपदावर निवड झाली. १९९१ मध्ये आयबीएमला भारतात आणण्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. ते वयाच्या ७५ व्या वर्षी निवृत्त झाले होते.

हेही वाचा-26/11: भविष्यातही एकतेसह संवेदनशीलता दाखविण्याचे रतन टाटांचे आवाहन

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा सॉफ्टवेअर क्षेत्रात जगभरात दबदबा-

भारतीय आयटी कंपन्यांचा जगात दबदबा असल्याचे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) सिद्ध केले आहे. टीसीएस ही जगातील सर्वात भांडवली मूल्य असलेली आयटी कंपनी ऑक्टोबर २०२० मध्ये ठरली आहे. टीसीएसने आयटी कंपन्याच्या भांडवली मूल्यात जगात प्रथम असलेल्या अक्सेंचरला यंदा मागे टाकले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details