बिझनेस डेस्क-ईटीव्ही भारत-कॉर्पोरेट क्षेत्रातील आघाडीची कंपनी टाटा स्टीलने कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला सामाजिक सुरक्षा योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तरी त्याच्या निवृत्तीच्या सेवेपर्यंत मिळणारे वेतन, घरभाडे भत्ता आणि वैद्यकीय भत्ता हा कुटुंबियांनी मिळणार आहे. याचा अर्थ कर्मचाऱ्याचा मृत्यू ४० व्या वर्षी झाली तरी पुढील २० वर्षे त्याच्या कुटुंबियांना कंपनीकडून वेतन दिले जाणार आहे.
टाटा स्टीलच्या सामाजिक सुरक्षा योजनेमुळे मृत कर्मचाऱ्याच्या कुटंबियांना सन्मानाने जगण्याची खात्री मिळणार आहे. याव्यतिरिक्त कंपनीकडून कर्मचाऱ्याच्या मुलांना शैक्षिणक भत्ताही मिळणार आहे. टाटा स्टीलने म्हटले की, आघाडीवर असलेल्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवाने कोरोनाने मृत्यू झाला तर कंपनीकडून कर्मचाऱ्याच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च पदवीपर्यंत करणार आहे. टाटा स्टीलकडून १६०० बेड्सचे, कोव्हिड आयसीयू बेड आणि आयसोलेशन बेडचे व्यवस्थापन करण्यात येत आहे.