नवी दिल्ली - सायरस मिस्त्री प्रकरणात राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय प्राधिकरणाने दिलेल्या निकालाला टाटा सन्स कंपनीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सायरस मिस्त्री यांची चेअरमनपदी फेरनियुक्ती टाळण्यासाठी टाटा सन्सचे प्रयत्न आहेत.
राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय प्राधिकरणाने (एनसीएलएटी) दिलेल्या संपूर्ण आदेशाला टाटा सन्सने आव्हान दिले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची ९ जानेवारीला बैठक आहे. त्यापूर्वी एनसीएलएटीच्या निकालाला स्थगिती मिळावी, यासाठी कंपनीचे प्रयत्न आहेत. सायरस मिस्त्री प्रकरणात ६ जानेवारीपूर्वी तातडीने सुनावणी घ्यावी, यासाठी टाटा सन्सचे वकील सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत.
हेही वाचा - मारुती सुझुकीसह महिंद्राच्या वाहन विक्रीत डिसेंबरमध्ये वाढ
एनसीएलएटीने काय दिला होता निकाल?