नवी दिल्ली - टाटा- सायरस मिस्त्री प्रकरणात एनसीएलएटीचे आदेश रद्द देणारा सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. या निकालाचे टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांनी स्वागत केले आहे. मुल्यांचे प्रमाणीकरण आणि नीतीमत्ता या बाबी नेहमीच ग्रुपच्या तत्वांना मार्गदर्शन करणारे ठरल्याचे रतन टाटा यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या निकालाचे रतन टाटा यांनी कौतुक करत आभारही मानले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने एनसीएलएटीचे आदेश रद्द केल्यावर रतन टाटा यांनी ट्वीट करून प्रतिक्रिया दिली आहे. टाटा सन्सचे चेअरमन टाटा म्हणाले की, हा जिंकण्याचा किंवा हरण्याचा मुद्दा नव्हता. माझ्या प्रामाणिकतेवर आणि नीतमत्तेच्या वागणुकीवर कठोर हल्ले करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाच्या निकालाने टाटा सन्सचे मूल्य आणि नैतिकतेचे सर्व अपील हे वैध ठरविले आहेत. न्यायव्यवस्थेने दाखविलेली निष्पक्षता आणि न्यायाला मजबुती देते.
संबंधित बातमी वाचा-टाटा -सायरस मिस्त्री वाद; सर्वोच्च न्यायालयाकडून एनसीएलएटीचे आदेश रद्द
काय आहे टाटा - सायरस मिस्त्री वाद ?
टाटा सन्सच्या संचालक मंडळाने सायरस मिस्त्री यांना चेअरमन पदावरून काढले होते. या निर्णयाला मिस्त्री यांनी एनसीएलएटीमध्ये आव्हान दिल्यानंतर एनसीएलएटीने मिस्त्री यांच्या बाजूने निकाल दिला होता. या निकालाला टाटा सन्सने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या निकालात सर्वोच्च न्यायालयाने टाटा सन्सच्या बाजुने निकाल दिला आहे.
हेही वाचा-'सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरू'
रतन टाटा यांनीही सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र दाखल केली होती याचिका-
टाटा सन्सच्या चेअरमनपदी सायरस मिस्त्री यांची नियुक्ती करण्याचे आदेश एनसीएलएटीने दिले होते. या निकालाला टाटा सन्स पाठोपाठ रतन टाटा यांनीही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. एनसीएलएटीने दिलेला निकाल हा चुकीचा आणि विसंगत असल्याचे टाटा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेत म्हटले होते. रतन टाटा यांनी टाटा सन्स व्यतिरिक्त स्वतंत्र याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेत म्हटले होते की, सायरस मिस्त्री यांची व्यावसायिक क्षमतेप्रमाणे नियुक्ती करण्यात आली होती. शापूरजी पाल्लूनजी ग्रुपचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली नव्हती. रतन टाटा यांनी टाटा सन्सचे नाव करण्यासाठी अर्ध्याहून अधिक आयुष्य व्यतीत केले आहे. त्यामुळे पुराव्याविना दिलेला एनसीएलएटीचा (राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरण) निकाल हा अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक असल्याचे याचिकेत म्हटले होते. सायरस मिस्त्री यांना टाटा डोकोमोसोबतच्या केलेल्या व्यवहारामुळे कंपनीच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचेही रतन टाटा यांनी याचिकेत म्हटले होते.