महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

नव्या वर्षात चारचाकी महागणार; मारुती सुझकीपाठोपाठ टाटा मोर्टसही किमती वाढविणार - मयांक पारीख

बीएस-६ निकष असलेल्या वाहनांच्या किमती वाढणार असल्याचे टाटा मोटर्सचे अध्यक्ष (प्रवासी वाहन व्यवसाय विभाग) मयांक पारीख यांनी सांगितले. साधारणत: वाहनांच्या किमती १० हजार ते १५ रुपयापर्यंत वाढतील, असे त्यांनी सांगितले. वाहनांच्या पूर्वीच्या मॉडेलची किंमती वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Tata Motors to hike passenger vehicle prices
संपादित - टाटा मोर्टसच्या वाढणार किमती

By

Published : Dec 4, 2019, 12:53 PM IST

जैसलमेर - नव्या वर्षात चारचाकी घेण्याचे तुमचे स्वप्न असेल, तर त्यासाठी तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कारण 'मारुती'पाठोपाठ टाटा मोर्टसने जानेवारीपासून किमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा मोटर्सच्या बीएस-६ इंजिन क्षमता असलेल्या प्रवासी वाहनांच्या किमती वाढविणार आहेत.

टाटा मोटर्सकडून हॅचबॅक टियागो (४.३९ लाख रुपये) ते एसयूव्ही श्रेणीतील हॅरियर (१६.८५ लाख रुपये) अशा विविध श्रेणीतील वाहनांची विक्री करण्यात येते. बीएस-६ निकष असलेल्या वाहनांच्या किमती वाढणार असल्याचे टाटा मोटर्सचे अध्यक्ष (प्रवासी वाहन व्यवसाय विभाग) मयांक पारीख यांनी सांगितले. साधारणत: वाहनांच्या किमती १० हजार ते १५ रुपयापर्यंत वाढतील, असे त्यांनी सांगितले. वाहनांच्या पूर्वीच्या मॉडेलची किंमती वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा-शेअर बाजार खुला होताच घसरला; अमेरिका-चीन व्यापार कराराच्या अनिश्चिततेचा परिणाम

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केवळ बीएस-६ इंजिन क्षमता असलेल्या वाहनांना १ एप्रिल २०२० पासून परवानगी असणार आहे. मारुती सुझुकीनेही उत्पादन खर्च वाढल्याने जानेवारीपासून किमती वाढविणार असल्याचे मंगळवारी जाहीर केले. टोयोटा, महिंद्रा अँड महिंद्रा आणि मर्सिडिज बेन्झ या कंपन्यांही वाहनांच्या किमती वाढविणार आहेत. ह्युंदाई मोटर इंडिया आणि होंडा कार्स इंडियाने वाहनांच्या किमती वाढविणार नसल्याचे म्हटले आहे. मात्र, बीएस-६ इंजिन क्षमता असलेल्या वाहनांच्या किमती वाढणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा-एचडीएफसीची नेट बँकिग, मोबाईल अॅप सेवा सलग दुसऱ्या दिवशी बंद.. ग्राहकांना मनस्ताप

ABOUT THE AUTHOR

...view details