महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

टाटा मोटर्सच्या जागतिक घाऊक विक्रीत सप्टेंबरमध्ये १६ टक्क्यांची घसरण - Global wholesales for Jaguar Land Rover

टाटा मोटर्सच्या वाणिज्य वाहनांच्या विक्रीत घसरण झाली आहे. तर डेईवूच्या श्रेणीतील वाहनांच्या विक्रीत गतवर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत २९ टक्क्यांनी अधिक विक्री झाली आहे.

टाटा मोटर्स
टाटा मोटर्स

By

Published : Oct 6, 2020, 6:19 PM IST

मुंबई - टाटा मोटर्सच्या जागतिक घाऊक विक्रीत सप्टेंबरमध्ये १६ टक्क्यांनी घसरण झाली आहे. जगभरात दुसऱ्या तिमाहीत टाटा मोटर्सच्या २ लाख २ हजार ८७३ वाहनांची विक्री झाली आहे. यामध्ये जग्वार लँड रोव्हरचाही समावेश आहे.

टाटा मोटर्सच्या वाणिज्य वाहनांच्या विक्रीत घसरण झाली आहे. तर डेईवूच्या श्रेणीतील वाहनांच्या विक्रीत गतवर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत २९ टक्क्यांनी अधिक विक्री झाली आहे. प्रवासी वाहनांच्या विक्रीत ९ टक्क्यांची घसरण झाली आहे.

हेही वाचा-भारतीय सेवा क्षेत्रात सर्वाधिक वाढ.. अनेक जणांच्या नोकऱ्यांवर गंडातर

जग्वार लँड रोव्हरची चालू वर्षाच्या जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत ९१ हजार ३६७ वाहनांची विक्री झाली. यामध्ये जग्वारच्या घाऊक विक्रीत १८ हजार १८९ वाहनांची विक्री झाली. तर लँड रोव्हरच्या घाऊक विक्रीचे प्रमाण हे ७३ हजार १७८ आहे.

दरम्यान, गतवर्षी मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा तर यंदा कोरोना महामारीचा वाहन उद्योगाला फटका बसला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details