नवी दिल्ली - टाटा सन्सने एनसीएलएटीच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १० जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे.
टाटा सन्सच्या याचिकेची १० जानेवारीला सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरील माहितीत म्हटले आहे. टाटा सन्सच्या याचिकेप्रकरणी सायरस इन्व्हेस्टमेंट्स, सायरस मिस्त्री आणि इतर जणांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केले.
हेही वाचा-'रिलायन्स'ला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; केंद्र सरकारची फेटाळली 'ही' याचिका
एनसीएलएटीच्या निकालाने कॉर्पोरेट लोकशाही आणि संचालक मंडळाच्या अधिकाराला सुरुंग लागणार असल्याचे टाटा सन्सने याचिकेत म्हटले आहे. दरम्यान, सायरस मिस्त्री यांनी टाटा सन्सचे संचालक पद स्वीकारण्यासाठी इच्छुक नसल्याचे रविवारी म्हटले आहे. दोन आठवड्याच्या हिवाळी सुट्टीनंतर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू झाले आहे.