नवी दिल्ली- कर संकलन घटत असतानाच दूरसंचार कंपन्यांकडून मिळणाऱ्या शुल्कामुळे सरकारला काही अंशी दिलासा मिळत आहे. व्होडाफोन आयडियाने केंद्रीय दूरसंचार विभागाला थकित एजीआरचे शुल्कापोटी २,५०० कोटी रुपये दिले आहेत. तर टाटा ग्रुपने २,१९० कोटी रुपये दिले आहेत. ही माहिती सरकारी सूत्राने दिली आहे.
एजीआर शुल्क थकित राहिल्याने सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार विभागाला खडसावले होते. त्यानंतर भारती एअरटेलने १०,००० कोटी रुपये दूरसंचार विभागाला दिले आहेत. उर्वरित रक्कम मूल्यांकन करून देण्यात येईल, असे भारती एअरटेलने म्हटले आहे. दूरसंचार विभागाने भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आदी दूरसंचार कंपन्यांना थकित शुल्क भरण्याची नोटीस बजाविली आहे. दूरसंचार विभागाने एजीआरचे थकित शुल्क वसूल केले नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला होता. त्यानंतर दूरसंचार विभागाने सर्कलनिहाय कंपन्यांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे.
संबंधित बातमी वाचा-व्होडाफोन आयडियाला 'सर्वोच्च' झटका; थकित शुल्कातील २,५०० कोटी रुपये स्वीकारण्यास नकार
काय आहे एजीआर शुल्क?