नवी दिल्ली– केंद्र सरकारकडून एअर इंडियाच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. एअर इंडियाच्या बोलीत केवळ टाटा ग्रुपने रस दाखविला आहे.
एअर इंडियाच्या खरेदीकरता केवळ टाटाची बोली - bidders for air india
टाटा ग्रुपला विमान वाहतूक क्षेत्राचा अनुभव आहे. पूर्वी एअर इंडिया सार्वजनिक कंपन्या होण्यापूर्वी टाटा ग्रुपच्या मालकीची होती. कोरोनाचे संकट आणि टाळेबंदीमुळे अनेक कंपन्या आर्थिक संकटात आहे.
टाटा ग्रुपला विमान वाहतूक क्षेत्राचा अनुभव आहे. पूर्वी एअर इंडिया सार्वजनिक कंपन्या होण्याूपूर्वी टाटा ग्रुपच्या मालकीची होती. कोरोनाचे संकट आणि टाळेबंदीमुळे अनेक कंपन्या आर्थिक संकटात आहे. तसेच जगभरातील विमान कंपन्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाच्या संकटाने पर्यटन आणि विमान वाहतूक क्षेत्रामुळे मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे बहुतेक कंपन्यांनी एअर इंडियाच्या खरेदीत निरुत्साह दाखविला आहे.
टाटाची भागीदारी कंपनी असलेल्या सिंगापूर एअरलाईन्सने एअर इंडियाच्या बोलीला नकार दिला आहे. एअर इंडियाच्या बोलीची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. त्यानंतर सरकारकडून मुदतवाढ मिळण्याची कमी शक्यता आहे. कोरोनाच्या संकटापूर्वीपासूनच एअर इंडिया कंपनी मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे.