नवी दिल्ली -हॉटेलात भरपूर पैसे खर्चूनही तयार केलेल्या अन्नाला घरातल्या पदार्थांसारखी चव नसल्याची अनेकांची तक्रार असते. अशा ग्राहकांची गरज लक्षात घेऊन स्विग्गी या ऑनलाईन फूड देणाऱ्या कंपनीने नव्याअॅपचा शुभारंभ केला आहे. 'स्विग्गी डेली' या अॅपमधून घरगुती आचारी (होम श ेफ), टिफीनची सेवा देणाऱ्यांकडून तयार केलेले घरगुती जेवण ग्राहकापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
ग्राहकांना ऑनलाईन मिळणार घरगुती जेवण , स्विग्गीकडून नव्या अॅपचा शुभारंभ - स्विग्गी
स्विग्गी डेली अॅपमधून ग्राहकांना जेवण हे रोज, आठवडा आणि महिनाभर घेण्यासाठी आगाऊ नोंदणी करता येणार आहे.

स्विग्गी डेली अॅपमधून ग्राहकांना जेवण हे रोज, आठवडा आणि महिनाभर घेण्यासाठी आगाऊ नोंदणी करता येणार आहे. स्विग्गीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहर्ष मजेटी म्हणाले, पुरवठादार आणि घरगुती आचाऱ्यांकडून देण्यात येणारी ही मिश्र सेवा आहे. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात घरगुती जेवण दिले जाणार आहे. तसेच ग्राहकांना दीर्घकाळासाठी लागणाऱ्या गरजेसाठी ही सुविधा असणार आहे.
ऑनलाईन घरगुती जेवण देण्याची सेवा सुरुवातीला गुरुग्राममध्ये देण्यात आली आहे. ही सेवा पुढील महिन्यात बंगळुरू आणि मुंबईत देण्यात येणार आहे. स्विग्गीची स्थापना २०१४ मध्ये करण्यात आली. स्विग्गीने देशातील १७५ शहरांमधून १ लाख रेस्टॉरंटशी भागीदारी केली आहे.