नवी दिल्ली - सुझुकी मोटरसायकल इंडियाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. कंपनीने मोफत सेवा आणि वॉरंटी कालावधी १५ जुलैपर्यंत वाढविला आहे.
ज्या वाहनांची मोफत सेवा आणि वॉरंटी १ एप्रिल ते ३१ एप्रिल २०२१ या कालावधीत संपत आहे, त्या वाहनांकरिता सुझुकी मोटरसायकलने मुदतवाढ दिली आहे. या कालावधीमधील वाहनांना मोफत सेवा आणि वॉरंटी ही १५ जुलै २०२१ पर्यंत वाढवून देण्यात आल्याचे कंपनीचे देशामधील प्रमुख सतोशी उशिडा यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-गुगल पेसारखे विविध डिजीटल वॉलेट ठेवण्याची लागणार नाही गरज; आरबीआयने 'हे' दिले निर्देश
वॉरंटी व मोफत सेवेचा कालावधी वाढविल्याने ग्राहकांची सोय होणार
अभूतपूर्व संकटात राज्यांनी टाळेबंदी लागू केल्याने सेवा देण्यावर निर्बंध आले आहेत. याचवेळी ज्यांनी सुझुकीच्या दोन चाकी वाहांवर विश्वास ठेवला, त्या ग्राहकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहोत. देश आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात आहे. वॉरंटी व मोफत सेवेचा कालावधी वाढविल्याने ग्राहकांची सोय होणार आहे. या ग्राहकांना टाळेबंदी काढल्यानंतर सेवा घेता येणार आहे.
हेही वाचा-भेदभाव केल्याने पाच महिला कर्मचाऱ्यांकडून अॅमेझॉनविरोधात न्यायालयात खटला दाखल
यापूर्वी होंडा, बजाज या दुचाकी कंपन्यांनीही मोफत सेवा व वॉरंटी कालावधी वाढविण्याचे जाहीर केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील बहुतांश राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.