नवी दिल्ली- हॉस्पिटलिटीमधील आघाडीची कंपनी ओयोने भारतासह चीनमधील हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. ओयोमध्ये गुंतवणूक केलेल्या सॉफ्टबँकेच्या कठोर निर्देशानंतर कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
एका माध्यमाच्या वृत्तानुसार, ओयोने भारतामधील 1 हजार 200 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. तर येत्या 4 महिन्यात तेवढ्याच कर्मचाऱ्यांना काढण्यात येणार असल्याचे वृत्तात म्हटले आहे. कंपनीने गुणवत्तेवर आधारित कामगिरीचा विचार करून कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याचा आधार घेत खराब कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याचे ओयोने म्हटले आहे. वृत्तानुसार, सॉफ्टबँकेने ओयोला चांगला नफा कमवण्याची 31 मार्च 2020 पर्यंत अंतिम मुदत दिली आहे.