मुंबई - टाळेबंदीत विमान सेवा रद्द झालेल्या स्पाईसजेट कर्मचाऱ्यांचे वेतन कमी करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने ५० हजार रुपयांहून अधिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना रोटेशनलप्रमाणे विनावेतन सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ विमानसेवा बंद असतानाच्या काळातील वेतन कर्मचाऱ्यांना मिळणार नाही.
स्पाईसजेटच्या कर्मचाऱ्यांना एप्रिलमधील पगार हा काम केलेल्या दिवसांएवढाच मिळणार असल्याचे सूत्राने सांगितले. गो-एअरनेही सुमारे ५ हजार ५०० कर्मचाऱ्यांना २५ मार्च ते ३१ दरम्यान विनावेतन सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.