महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

स्पाईसजेटच्या मालवाहू विमान ताफ्यात एअरबस ए 340 होणार दाखल - SpiceJet latest news

स्पाईजजेटचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह म्हणाले, की एअरबस ए 340 ची सेवा सुरू करणे हे देशातील मालवाहू वाहतुकीसाठी आमूलाग्र बदल घडविणारे ठरणार आहे. युरोप, आफ्रिका आणि कॉमनवेल्थमधील स्वतंत्र देशांसाठी लवकरच विना थांबा मालवाहू विमान वाहतूक सेवा सुरू करणार आहोत.

संग्रहित - स्पाईसजेट विमान
संग्रहित - स्पाईसजेट विमान

By

Published : Aug 17, 2020, 1:21 PM IST

मुंबई– स्पाईसजेट लवकरच मालवाहू विमानांमध्ये पहिल्यांदाच लांब पल्ल्यावर वाहतूक करणाऱ्या एअरबस ए 340 चा समावेश करणार आहे. त्यामुळे कंपनीला युरोप, आफ्रिका अशा लांबच्या पल्ल्यावरही मालवाहू विमान वाहतूक करता येणार आहे.

स्पाईसजेटकडे एकूण नऊ मालवाहू विमाने होणार आहेत. यापूर्वी 737 एस ही 5 बोईंग विमाने, तीन बॉम्बार्डियर क्यू 400एस ही स्पाईसजेटच्या ताफ्यात आहेत. स्पाईजजेटचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह म्हणाले, की एअरबस ए 340 ची सेवा सुरू करणे हे देशातील मालवाहू वाहतुकीसाठी आमूलाग्र बदल घडविणारे ठरणार आहे. युरोप, आफ्रिका आणि कॉमनवेल्थमधील स्वतंत्र देशांसाठी लवकरच विना थांबा मालवाहू विमान वाहतूक सेवा सुरू करणार आहोत. लांब टप्प्याच्या मालवाहू विमान वाहतूक सेवेमुळे देशातील शेतकरी, औषधी आणि कंपन्यांना यापूर्वी मिळू न शकणाऱ्या बाजारपेठा उपलब्ध होवू शकणार आहेत.

स्पाईसजेट 25 मार्च 2020 पासून मालवाहू विमान सेवेतून 31 हजार टन मालाची वाहतूक केली आहे. त्यासाठी स्पाईसजेटने 5,600 मालवाहू विमानांची उड्डाणे झाली आहेत. स्पाईसजेट आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सेवेतून जगभरात 41 ठिकाणी वाहतूक करण्यात येते.

दरम्यान, कोरोना महामारीत प्रवासी विमान वाहतुकीवर परिणाम झाल्याने विमान कंपन्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत मालवाहतूक विमान सेवा हा कंपन्यांना उत्पन्नाचा नवा मार्ग ठरत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details