सेऊ- जेट एअरवेजची सेवा बंद झाल्यानंतर नोकरी गमाविलेल्या कर्मचाऱ्यांना स्पाईसजेट कंपनीकडून मोठा दिलासा मिळणार आहे. स्पाईसजेट जेटच्या २ हजार कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार आहे.
स्पाईसजेटचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांना कंपनीच्या विस्ताराबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की स्पाईसजेटने यापूर्वी जेट एअरवेजची २२ विमाने खरेदी केली आहेत. आम्ही मोठ्या प्रमाणात जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना नोकरीत घेणार आहोत. यापूर्वी सुमारे १ हजार १०० लोकांना नोकरीत घेतले आहे. जेटचे वैमानिक, केबिन क्र्यू , सुरक्षा अधिकारी आदी कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देणार आहोत. चालू आर्थिक वर्षात क्षमतेच्या ८० टक्के विस्तार करणार आहोत. कंपनीची आर्थिक स्थिती चांगली असून फार थोडे कर्ज असल्याचे त्यांनी सांगितले.