नवी दिल्ली - ज्या ग्राहकांना आरोग्य विमा योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना मासिक हप्त्याचीही सोय मिळणार आहे. याबाबत विमा नियामक संस्था आयआरडीएने कंपन्यांना निर्देश काढले आहेत. सध्या ग्राहकांना आरोग्य विमा योजनेसाठी वर्षभरासाठी एकदाच हप्ता भरावा लागत आहे.
ग्राहकांना मासिक हप्त्याची सोय उपलब्ध करून देताना मूळ विमा योजनेच्या हप्त्यात बदल करता येणार नसल्याचे आयआरडीएने म्हटले आहे. विमा हप्ता हा मासिक, त्रैमासिक किंवा सहा महिन्यासाठी असावा. आयआरडीएने अधिसूचना काढून विमा हप्त्याच्या संचरनेत बदल करण्याची विमा कंपन्यांना परवानगी दिली आहे.