मुंबई - कोरोनाच्या लढाईत देशाला साथ देण्यासाठी अनेक उद्योग पुढे येत आहेत. सोनालिका ट्रॅक्टर कंपनीने व्हेटिंलेटर विकसित केले आहे. दर महिन्याला ३ हजार व्हेटिंलेटर तयार करण्याची क्षमता असल्याचे सोनालिका कंपनीने म्हटले आहे.
सोनालिकाने तयार केलेले व्हेटिंलेटर हे अतिदक्षता विभागासाठी तयार केले आहेत. त्यामध्ये स्वदेशी बनावटीचे ऑईल फ्री कॉम्प्रेसर बसविण्यात आले आहे. त्यामुळे अतिदक्षता कक्षाच्या बाहेरही हे व्हेटिंलेटर काम करू शकते. देशातील अनेक रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता असल्याच्या पार्श्वभूमीवर हे व्हेटिंलेटर अत्यंत उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. देशाच्या अडचणीच्या काळात मेक इन इंडियामध्ये योगदान देता येत असल्याने खूप समाधान वाटत असल्याचे सोनालिका ग्रुपचे चेअरमन अमरित मित्तल यांनी म्हटले आहे.