नवी दिल्ली- कोरोनाचा प्रसार वाढत असताना वैयक्तिक स्वच्छतेच्या उत्पादनांची मागणी वाढली आहे. असे असले तरी हिंदुस्थान युनिलिव्हर, गोदरेज आणि पतंजली कंपनीने साबणासह इतर स्वच्छतेच्या उत्पादनांच्या किमती कमी केल्या आहेत. तसेच मागणीची पूर्तता करण्यासाठी उत्पादनही वाढविले आहे.
हिंदुस्थान युनिलिव्हर लि. (एचयूएल) कंपनीने कोरोनाला लढण्यासाठी १०० कोटींची मदत देण्याचे जाहीर केले आहे. जनतेच्या हितासाठी लाईफबॉय सॅनिटायझर, लाईफबॉय लिक्विड हँडवॉश आणि डोमेक्स क्लिनरच्या किमती १५ टक्क्यांनी कमी केल्या आहेत. किमती कमी करून उत्पादन वाढविले आहे. ही उत्पादने आगामी आठवड्यात बाजारात उपलब्ध होणार आहेत.
हिंदुस्थान युनिलिव्हरने त्यांच्या उत्पादनांच्या किंमती कमी करून उत्पादन वाढविले आहे. येत्या काही महिन्यांत हिंदुस्थान लिव्हरकडून गरजु लोकांसाठी २ कोटी लाईफबॉय साबणांचे वाटप करणार आहे.