बंगळुरू- मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा वाहनांचे सुट्टे भाग उत्पादन करणारी बॉश इंडियाला फटका बसला आहे. कंपनीने चालू वर्षातील तिसऱ्या तिमाहीत एकूण ३० दिवस उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
बॉश इंडियाने काही दिवस उत्पादन बंद करणार असल्याची शेअर बाजाराला माहिती दिली आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये प्रत्येकी १० दिवस देशभरातील उत्पादन प्रकल्प बंद राहणार आहेत. दहा दिवस उत्पादन कमी केल्याने कंपनीला पॉवरट्रेनच्या विक्रीप्रमाणे उत्पादन करणे शक्य होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ही जर्मन कंपनी ६८ वर्षे जुनी आहे. यापूर्वी मायको इंडस्ट्रीज असे बॉश इंडियाचे नाव होते. कंपनीचे देशात १८ उत्पादन प्रकल्प आहेत. तर देशभरात सात विकसन केंद्रे आहेत.
हेही वाचा-व्यवसायाकरिता सण ठरला चांगला 'मुहूर्त'; शाओमीच्या ५३ लाख स्मार्टफोनची विक्री