मुंबई- युरोपियन कार कंपनी स्कोडाही इतर कंपन्याप्रमाणे वाहनांच्या किमती वाढविण्याची शक्यता आहे. स्कोडाच्या किमती १ जानेवारी २०२१ पासून २.५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
मारुती सुझुकी, निस्सान, फोक्सवॅगनसह विविध वाहन कंपन्यांनी १ जानेवारी २०२१ पासून वाहनांच्या किमतीत वाढ केली आहे. उत्पादनाचा वाढलेला खर्च आणि कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती या पार्श्वभूमीवर वाहन कंपन्यांनी किमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा-एलआयसीकडून २ टक्के हिश्श्याची आयसीआयसीआय बँकेला विक्री
जागतिक बाजारात बदललेली स्थिती आणि विदेशी विनियम दरामुळे उत्पादनाचा खर्च वाढल्याचे स्कोडा ऑटो इंडियाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. विविध मॉडेलच्या किमती १ जानेवारीपासून २.५ टक्क्यांनी वाढविण्यावर विचार सुरू असल्याचेही प्रवक्त्याने म्हटले आहे.
हेही वाचा-टेस्ला पुढील वर्षी भारतात येणार- नितीन गडकरी
फोक्सवॅगनच्याही वाढणार किमती-
उत्पादनाचा खर्च वाढल्याने फोक्सवॅगनच्या किमती वाढविण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. फोक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाचे प्रवक्ते म्हणाले की, जानेवारी २०२१ पासून फोक्सवॅगन इंडियाने वाहनाच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच मारुती सुझुकीसह इतर कंपन्यांनीही वाहनांच्या किमती जानेवारी २०२१ पासून वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.