मुंबई - रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक करणारी सिल्व्हर लेक कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लि. कंपनीत ७ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणार आहे. ही माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजने जाहीर केली आहे.
रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक केल्यानंतर सिल्व्हर लेकला रिलायन्स रिटेलमध्ये १.७५ टक्के हिस्सा मिळणार आहे. रिलायन्स रिटेल ही रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीची कंपनी आहे. रिलायन्स रिटेलचे देशात १२ हजार स्टोअर आहेत. रिलायन्स रिटेलने २० दशलक्ष लहान आणि असंघटित व्यापाऱ्यांचे व्यवसाय डिजीटायलेझेशन करण्याची रणनीती आखळी आहे. सिल्व्हर लेक ही तंत्रज्ञान कंपनीमध्ये गुंतवणूक करणारी जगातील आघाडीची कंपनी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन व व्यस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले, की सिलव्हर लेकबरोबरील संबंधात विस्तार करताना आम्हाला आनंद होत आहे. सिल्व्हर लेक ही आमच्या भारतीय रिटेलच्या व्हिजनसाठी महत्त्वाची भागीदार आहे.