मुंबई - उद्योगपती राहुल बजाज यांनी कुटुंब परंपरेचे मूल्य व वारसा स्वीकारला आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल बजाज यांचे कौतुक केले आहे. उद्योगपती आणि बजाज ग्रुपचे प्रमुख राहुल बजाज यांनी आज कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी १०० कोटी रुपये देणार असल्याचे जाहीर केले आहे.
शरद पवार यांनी ट्विट करून राहुल बजाज यांना धन्यवाद दिले आहेत. राहुल बजाज हे नेहमीच देशासाठी अतिशय उदारपणे मदत करतात. त्याबद्दल बजाज यांचे शरद पवार यांनी मित्र म्हणून आभार मानले आहेत.
हेही वाचा-बांधकाम मजुरांसाठी अर्थमंत्री सीतारामन यांचा दिलासादायक निर्णय
बजाज हे करणार आहेत मदत-
कोरोनाच्या लढ्यासाठी बजाज हे सरकारला १०० कोटींची मदत करणार आहेत. तसेच पुण्यासह जिल्ह्यात आरोग्याच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. यामध्ये सरकारने निवडलेल्या रुग्णालयातील अतिदक्षता विभाग आणि सरकारी रुग्णालयाती अतिदक्षता विभागात सुविधा, टेस्ट आदींचा समावेश आहे. राहुल बजाज यांनी आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी, आपत्कालीन विभागातील कर्मचारी आणि स्थानिक पोलिसांना अभिवादन केले आहे. कोरोनामुळे रोजगारावर परिणाम झालेले लोक व ग्रामीण भागातील जनतेसाठीही मदत करण्यात येणार असल्याचे बजाज यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा-उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना जूनपर्यंत ३ गॅस सिलिंडर मिळणार मोफत